कुणाल किनळेकर यांनी मानले आ. निलेश राणेंचे धन्यवाद

आम्ही आपल्या सोबत येण्यास तयार – कुणाल किनळेकर

सिंधुदुर्ग : जवळपास वीस वर्षांपासून कोकणाच्या प्रगतीसाठी अडथळा ठरलेल्या मुंबई गोवा महामार्ग प्रश्नावर आमदार निलेश राणे यांनी विधान भवनात जे परखड भाष्य केले त्यासाठी कोकणवासीय तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिंधुदुर्गच्या वतीने त्यांचे धन्यवाद. आमदार निलेश राणे यांनी विधान भवनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातून दुसरा महत्त्वाचा विषय मांडला तो म्हणजे वन विभागाच्या गलथान कारभाराचा. आतापर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सरकार मार्फत रोजगारासाठी कोणत्याही उपाययोजना होत नसताना हतबल आमदार दीपक केसरकर यांच्या मतदार संघात सावंतवाडी तालुक्यातील तळवडे गावचे नागरिक कात उद्योजक श्री.नारायण जाधव यांचा शासन नियमानुसार सुरू असलेला कात व्यवसाय बंद करण्यासाठी वनविभागाचे परराज्यातील अधिकारी जीवाचा आटापिटा करताना दिसत आहेत. आणि म्हणूनच आमदार निलेश राणे यांना जिल्ह्याचा नागरिक म्हणून विनंती आहे की केवळ वनमंत्र्यांना टार्गेट म्हणून नाही, तर जिल्ह्यातील सामान्य नागरिकांना व व्यावसायिकांना या परराज्यातील पर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांमार्फत होणारा त्रास यासाठी प्रत्यक्षात वस्तुस्थितीची माहिती घेऊन त्या विभागावर धडक द्यावी. प्रशासनाला जाग आणण्याकरिता आंदोलनात्मक भूमिकेसाठी सिंधुदुर्गातील नागरिकांसाठी आम्ही आपल्या सोबत येण्यास तयार आहोत असे प्रतिपादन मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी केली आहे.

error: Content is protected !!