कविलकाटे येथील ग्रीन झोन काढण्यासाठी समिल जळवी यांचे कुडाळ नगरपंच्यायत मुख्यधिकारी यांना निवेदन.

कुडाळ : नगरपंचायत हद्दीतील गाव मौजे कविलकाटे येथील महसुली गावात बहुतांश भागतील ग्रीन झोनमध्ये समाविष्ट आहे सदर चा झोन हा काढण्यासाठी कविलकाटे येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. समिल जळवी यांनी कुडाळ नगरपंच्यायात चे मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन चर्चा केली. आणि याचा शासन दरबारी लवकरात -लवकर पाठपुरावा करून ग्रीन झोन काढण्यासाठी मागणी केली.

गेले कित्तेक वर्षे कुडाळ शहरातील नगरपंच्यायत हद्दीतील कविलकाटे १. नंबर वॉर्ड मधील शेतकरी आणि नागरीकांची प्रमुख्याने आग्रहाची मागणी अशी आहे कि, “आमच्या कविलकाटे येथील जमिनीवरील ग्रीन झोन ऊठवावा ” कविलकाटे या महसूली गावात लोकांच्या जवळपास 60% जमिनीवर ग्रीन झोन खाली लागलेला आहे.आणि हा ग्रीन झोन सध्याच्या स्तितीत येथील नागरिकांची गंभीर बाबा आहे. हा ग्रीन झोन लागल्यामुळे गावातील लोकांना घर बांधणी करणे, घर दुरुस्ती करणे, घरापर्यंत वीज नेणे तसेच घरासाठी बँकेकडून लोन घेणे, नवीन घरासाठी घर नंबर घेणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे यातील कोणत्याच प्रक्रियेत कविलकाटे येथील नागरिकांना सहभाग घेता येत नाही. त्यामुळे या भागातील शेतकरी, तसेच नागरिक या ग्रीन झोनला त्रस्त झाले आहेत.त्यामुळे नागरिकांना अडचणीना सामोरे जावे लागत आहे. याच विषयावर कविलकाटे येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. समिल प्रभाकर जळवी यांनी कुडाळ नगरपंच्यायत चे मुख्याधिकारी श्री.विनायक ओंधकर यांना लेखी निवेदन देत लक्ष वेधले आहे.

error: Content is protected !!