दिगशी गावात शिवजन्मोत्सव सोहळा खूप मोठ्या उत्साहात साजरा

शिवप्रेरित युवा संघटनेचे आयोजन

शिवप्रेरित युवा संघटना दिगशी आयोजित भव्य शिवजयंती उत्सव सोहळा खूप मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला . यावेळी ग्रामस्थ खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते खास करून महिलांची उपस्थिती लक्षणीय होती इतर गावातील शिवप्रेमी देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

दिगशी गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून या सोहळ्याला सुरुवात करण्यात आली.यावेळी संपूर्ण परिसर ” छत्रपती शिवाजी महाराज की जय।”, “जय भवानी जय शिवाजी” , “तुमचं आमचं नात काय जय जिजाऊ जय शिवराय” अश्या घोषणांनी दणाणून गेला.
यावेळी शिवप्रेरित युवा संघटनेच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या “माझं गाव दिगशी ” या स्वागत स्तंभाचं आणावरण श्री. नासिर काझी यांच्या हस्ते करण्यात आले .तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचा शाल ,श्रीफळ ,पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना नासिर काझी यांनी संघटनेच्या कार्याच कौतुक करत इतर गावांनी या संघटनेचा आदर्श घ्यावा असं आव्हाहन देखील केले.
दुपारी उपस्थित सर्व शिवभक्तांनी स्नेहभोजनाचा लाभ घेतला .
सायंकाळी महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला त्यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यानंतर महिलांसाठी संगीत खुर्ची स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं.
यावर्षीची पैठणीच्या मानकरी ठरल्या सौ. आरती गजानन मोरे.
या सोबतच उपस्थित सर्वांसाठी अनेक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या व विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली.
प्रेक्षकांना देखील लकी ड्रॉ च्या माध्यमातून बक्षिसे जिंकता आली.

या कार्यक्रमानिमित्त घेण्यात आलेला सर्व स्पर्धांची बक्षीसे दरवर्षी प्रमाणे श्री. सुरेश मांडवकर यांच्या कडून देण्यात आली.

रात्री 8 वाजता बुवा श्री.मोतीराम सोलकर यांच्या सुस्वर भजनाने शिवजन्मोत्सव सोहळ्याची अजूनच शोभा वाढवली.
त्यांनतर सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली, रात्री 12 पर्यंत रंगलेला या सांस्कृतिक कार्यक्रमांनतर बक्षीस वितरण करून या सोहळ्याची सांगता झाली.

या कार्यक्रमासाठी माजी जिल्हा उपाध्यक्ष श्री. नासिर काझी, जिल्हा परिषद सदस्य -श्री.प्रमोद रावराणे,पंचायत समिती सदस्या – सौ. सुवर्णा संसारे,श्री.देवानंद पालांडे, शारदा कांबळे,सरपंच -प्रियांका हरयाण ,संतोष हरयाण,उपसरपंच -चंद्रकांत पाष्टे, महेश संसारे ,ग्रामपंचायत सदस्या सायली धुरी,चित्रा हरयाण,ओमकार हरयाण ,सुरेश हरयाण, जयराज हरयाण ,सुप्रिया मंचेकर अशा अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

यावेळी उपस्थित सर्वांचे व हा सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे शिवप्रेरित युवा संघटनेचे अध्यक्ष श्री .स्वप्निल (पप्पू) धुरी यांनी आभार मानले.

error: Content is protected !!