विद्यार्थ्याने साकारले हुबेहूब रेखाचित्र
सावंतवाडी: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण राज्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर, सावंतवाडी येथील बी. एस. बांदेकर कला महाविद्यालयाच्या वतीने २९ जानेवारी रोजी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी महाविद्यालयातील तृतीय वर्षात शिकणाऱ्या आर्यन बेलेकर या विद्यार्थ्याने आपल्या कलेच्या माध्यमातून दादांना मानवंदना दिली. आर्यनने अजितदादांचे एक अत्यंत आकर्षक आणि हुबेहूब रेखाचित्र साकारले होते, ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या कलाकृतीच्या माध्यमातून त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या.
या श्रद्धांजली सभेला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय वेले उपस्थित होते. तसेच विविध विभागांचे प्रमुख आणि प्राध्यापक वृंदानीही उपस्थित राहून दादांच्या स्मृतींना उजाळा दिला. यामध्ये श्री. तुकाराम मोरजकर, प्रा. सिद्धेश नेरुरकर, प्राजक्ता वेंगुर्लेकर, राधा गावडे, चेतन जगताप, आत्माराम शिरोडकर, तुळशीदास नाईक, धनंजय परब, अनिल बांदेकर, सुभाष राव आणि पल्लवी गावडे यांचा समावेश होता.
याप्रसंगी शिक्षकेतर कर्मचारी चारुदत्त शंकरदास, तन्वी गावडे, विजय झोरे आणि कृष्णा पालयेकर यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. “अजितदादांच्या रूपाने महाराष्ट्राने एक कणखर नेतृत्व गमावले आहे,” अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.


Subscribe







