बहुप्रतिक्षित असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची तारीख आज जाहीर झाल्यानंतर जिल्ह्याचे राजकीय वातावरण चांगलेच गरम झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अत्यंत महत्वाचा मानला मतदारसंघ म्हणजे वेताळ बांबर्डे जिल्हा परिषद मतदारसंघ… या मतदारसंघातून अनेक दिग्गज निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. परंतु शिंदेंच्या शिवसेनेकडून एक नाव सध्या जोरदार चर्चेत आहे. ते नाव म्हणजे शिवसेना उपजिल्हाप्रमुख आनंद भास्कर शिरवलकर यांचे
जवळपास गेली दोन दशके ते राणे कुटुंबियांच्या संपर्कात असून आमदार निलेश राणे यांचे कट्टर समर्थक अशी त्यांची ओळख आहेत. आमदार निलेश राणे यांच्या मुशीत तयार झाल्यामुळे शासन आणि प्रशासनाचा दांडगा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. राजकारणाचे बाळकडू त्यांना आमदार निलेश राणे यांच्याकडून मिळाले आहे. शिवाय प्रत्येकाच्या सुख – दुःखात ते नेहमी सहभागी होतात. शिवाय रात्री अपरात्री ते एका फोनवर अडलेल्या व्यक्तीच्या मदतीला धाऊन येतात.
यावेळी एका नवीन तरुण चेहऱ्याला प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी अशी सर्वांची इच्छा असून मतदारसंघाच्या विकासासाठी लागणारा निधी खेचून आणण्याची धमक त्यांच्यात निश्चितच आहे. वरील सर्व गोष्टींचा विचार करता वेताळ बांबर्डे जिल्हा परिषद मतदारसंघातून आनंद शिरवलकर हे प्रमुख दावेदार मानले जात आहेत. वेताळ बांबर्डे जिल्हा परिषद मतदारसंघातून आनंद शिरवलकर यांच्या नावाची जोरदार चर्चा असून त्यांना पक्षाने संधी सर्वांनाच आनंद होणार आहे…


Subscribe







