कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकप्रिय न्यूज चॅनेल ‘सिंधुदर्पण’च्या वतीने नवीन वर्षाच्या निमित्ताने खास दिनदर्शिका तयार करण्यात आली असून, या दिनदर्शिकेचे कुडाळ येथे मान्यवरांच्या हस्ते उत्साहात अनावरण करण्यात आले.
या सोहळ्याला पत्रकारिता आणि उद्योग क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. यामध्ये दैनिक रत्नागिरी टाइम्सचे ज्येष्ठ पत्रकार रवी गावडे, दैनिक सकाळचे ज्येष्ठ पत्रकार अजय सावंत, दैनिक प्रहारचे विलास कुडाळकर, एनडीटीव्ही मराठीचे गुरुप्रसाद दळवी, दैनिक नवराष्ट्रचे रोहन नाईक तसेच उद्योजक राजन घाडी आणि युवा उद्योजक ओंकार घाडी यांचा समावेश होता.
याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांनी सिंधुदर्पण न्यूज चॅनेलचे संचालक चिन्मय घोगळे यांचे विशेष अभिनंदन केले. चॅनेलने अत्यंत कमी वेळात विश्वासार्हता जपली असून ही नवी दिनदर्शिका नागरिकांसाठी उपयुक्त ठरेल, अशा भावना व्यक्त करत मान्यवरांनी चॅनेलच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.