एडगांव येथील शहीद विजय साळसकर स्मारक उजळले

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते हायमास्टचा शुभारंभ

वैभववाडी प्रतिनिधी

एडगांव येथील शहीद विजय साळसकर स्मारक येथे उभारण्यात आलेल्या हायमास्टचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडले. पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नातून विजय साळसकर स्मारक येथे चार हायमास्ट मंजूर झाले आहेत . त्याचा उद्घाटन सोहळा आज पार पडला.

यावेळी वैभववाडी भाजपा भाजपा अध्यक्ष सुधीर नकाशे, भाजपा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, जयेंद्र रावराणे, अरविंद रावराणे, भालचंद्र साठे, दिगंबर पाटील, एडगांव सरपंच सौ. रवीना तांबे, उपसरपंच प्रज्ञा रावराणे, रवळनाथ विकास सोसायटी चेअरमन सुनील रावराणे, बुथ अध्यक्ष विनोद रावराणे, राजू पवार, उत्तम सुतार, रत्नाकर कदम, रवींद्र रावराणे, ग्रामपंचायत अधिकारी स्नेहलता सावंत, गावातील ग्रामस्थ व भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!