प्रत्येक गावात उभे राहिला आदर्श समाज भवन
एडगांव – वायंबोशी येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर समाज भवनाचे नामदार नितेश राणेंच्या हस्ते उद्घाटन
वैभववाडी : समाज भवनाच्या माध्यमातून थोर युगपुरुषांचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा आदर्श प्रत्येक पिढीने घेतला पाहिजे. समाज भवन समाजाला निश्चित संघटित ठेवेल. प्रत्येक गावागावात समाज भवन उभारणार, असे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केले.
एडगांव – वायंबोशी येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर समाज भवन इमारतीचा उद्घाटन सोहळा मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी भाजपा अध्यक्ष सुधीर नकाशे, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, जयेंद्र रावराणे, भालचंद्र साठे, सुनील रावराणे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती पुन, दिगंबर पाटील, प्रकाश पाटील, प्रकाश अडुलकर, नवलराज काळे, गंगाराम अडुळकर, कोंडीबा अडुळकर, व धनगर बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी नितेश राणे म्हणाले, नूतन वास्तूची देखभाल दुरुस्ती सर्वांनी घेतली पाहिजे. आदर्शवत समाज भवन प्रत्येक गावागावात उभे राहील. या भावनातून युवा पिढीकडून प्रेरणादायी काम घडले पाहिजे. याठिकाणी ग्रंथ, पुस्तके उपलब्ध करून दिली जातील. धनगर समाज नेहमी खासदार नारायण राणेंच्या पाठीशी राहिला आहे. समाजाच्या विकासात कुठेही आम्ही कमी पडणार नाही. असे सांगितले. जयेंद्र रावराणे, प्रमोद रावराणे, गंगाराम अडुळकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी समाज भवनला विनामूल्य जमीन उपलब्ध करून देणाऱ्या पांडुरंग शेळके व रुक्मिणी शेळके यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वायंबोशी येथे धनगर बांधवांनी पारंपरिक गजनृत्य सादर करत नामदार नितेश राणेंचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार स्वप्निल गुरखे यांनी मानले.



Subscribe









