रामगड सरपंच शुभम मठकर यांनी आचरा पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्री पवार यांची भेट घेत दिले निवेदन
संतोष हिवाळेकर /पोईप
कणकवली- आचरा राज्य महामार्गावर सातत्याने अपघात होत आहेत. काही दिवसांपूर्वीच हिट एंड रन सारखा प्रकार महामार्गावर झाला. मात्र महामार्गावर कुठेही वाहतुकीवर नजर ठेवणारी सीसीटीव्ही यंत्रणा नाही. काही खाजगी दुकानदारांजवळ सीसीटीव्ही असून त्यातून गुन्हेगारांचा शोध घेणं कठीण आहे. त्यामुळेच रामगड- बेळणे येथील चेकपोस्ट वर सीसीटीव्ही यंत्रणा बसवल्यास गुन्हेगारांचा शोध घेण व त्यांच्यावर जरब बसवणे सोयीचे ठरेल. यासाठी ही यंत्रणा लवकरात लवकर लावण्यात यावी अशी मागणी निवेदन देऊन करण्यात आली . या संदर्भात रामगड सरपंच शुभम मटकर उपसरपंच राजेंद्र जाधव ग्रा प सदस्य अमित फोंडके यांनी ग्रामपंचायत रामगड च्या वतीने भेट घेतली. आचरा पोलीस निरक्षक श्री पवार यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद देत. लवकरात लवकर सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यासाठी पाठपुरवा करणार असल्याचे सांगितले.