भुसारी दुकानदाराचा मृत्यू
कणकवली : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील तळरे येथील दळवी कॉलेजसमोर शिटोने फाट्यावर आज (शनिवार) दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास भरधाव मारुती सेलेरीओ कारने होंडा ॲक्टिवा दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात फोंडाघाड बाजारपेठेतील भुसारी दुकानदार चंद्रकांत कृष्णाजी फोंडके (वय अंदाजे) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, फोंडाघाड येथील भुसारी दुकानदार चंद्रकांत फोंडके हे सकाळी तळरे-खारेपाटण भागात आपल्या मालाची वसुली करण्यासाठी गेले होते. वसुली पूर्ण करून ते दुचाकीवरून (होंडा ॲक्टिवा) फोंडाघाटाच्या दिशेने परत येत असताना हा अपघात घडला.
बेळगावहून गणपतीपुळे येथे देवदर्शनासाठी आलेले कारचालक हेमंत रेमानसे हे आपल्या मित्र व कुटुंबीयांसह मारुती सेलेरीओ कारने (क्रमांक) गणपतीपुळेहून बेळगावच्या दिशेने परतत होते. तळरे येथील दळवी कॉलेजसमोर शिटोने फाट्याजवळ त्यांची भरधाव कार दुचाकीला मागून आदळली.
या अपघातात दुचाकीस्वार चंद्रकांत फोंडके हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी कणकवली येथील रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन जात असताना, प्रवासादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने फोंडाघाड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अपघाताची माहिती मिळताच कणकवली पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक पन्नाळे, हवालदार मिलिंद देसाई आणि महिला कॉन्स्टेबल तांबे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अपघाताचा प्राथमिक पंचनामा करून कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.














 
	

 Subscribe
Subscribe









