कणकवलीत लक्झरी बस आणि जुपिटर स्कूटीमध्ये अपघात

२३ वर्षीय युवक जखमी

कणकवली: बेळणे येथील रामानंद व्हिलेज रिसॉर्टसमोर शनिवारी सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास एका लक्झरी बसला जुपिटर स्कूटीची धडक बसून अपघात झाला. या अपघातात स्कूटीस्वार २३ वर्षीय युवक जखमी झाला असून त्याला उपचारांसाठी कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणेहून गोव्याच्या दिशेने जाणारी एक लक्झरी बस बेळणे येथे रस्त्याच्या कडेला उभी होती. याचवेळी कणकवलीच्या दिशेने जाणारा दुचाकीस्वार सुरज संतोष मुंडगेकर (वय २३, रा. बेळणे, वरची वाडी) याच्या जुपिटर स्कूटीची या उभ्या असलेल्या लक्झरी बसच्या मागच्या बाजूला जोरदार धडक बसली.

या अपघातात दुचाकीचे मोठे नुकसान झाले असून स्कूटीस्वार सुरज मुंडगेकर हा युवक जखमी झाला. त्याला तातडीने उपचारांसाठी कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, जेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी वाहतूक पोलीस हवालदार दिलीप पाटील, हवालदार मिलिंद देसाई, कॉन्स्टेबल तांबे यांच्यासह हायवे ट्रॅफिक पोलीस उपनिरीक्षक संतोष राठोड, हवालदार ठाकूर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी धाव घेतली. त्यांनी पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही केली.

error: Content is protected !!