सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी व आरक्षित समाजाच्या उद्याच्या आंदोलनासाठी चक्क सुहास सावंत यांना निमंत्रण

ॲड. सुहास सावंत आमंत्रण स्वीकारणार का ?

ओबीसी समाजाच्या मंचावरून ॲड. सुहास सावंत नेमकी काय भूमिका मांडणार ?

उद्याच्या आंदोलनावर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लक्ष

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी व आरक्षित समाज महासंघ, सिंधुदुर्ग यांच्या पुढाकाराने मंगळवार दिनांक २३ सप्टेंबर व बुधवार दिनांक २४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता लाक्षणिक व धरणे आंदोलन घोषित करण्यात आले आहे. या आंदोलनासाठी चक्क अखिल भारतीय मराठा महासंघ, सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष ॲड. सुहास सावंत यांना निमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओबीसी व मराठा बांधवांचे लक्ष उद्याच्या आंदोलनाकडे लागून राहिले आहे.

सध्या महाराष्ट्रात ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्राच्या विविध भागात ओबीसी समाज रस्त्यावर उतरून याबाबतची अस्वस्थता शासनाच्या निदर्शनास आणून देऊ पाहत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओबीसी समाज देखील यासाठी मंगळवार दिनांक २३ सप्टेंबर रोजी आंदोलन छेडणार आहे. या आंदोलनासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष ॲड. सुहास सावंत यांना निमंत्रित करण्यात आले आहे. ॲड. सुहास सावंत हे निमंत्रण स्वीकारणार का ? उद्या ओबीसी महासंघाच्या मंचावर सुहास सावंत दिसणार का ? ओबीसी महासंघाच्या मंचावरून ॲड. सुहास सावंत नेमकी काय भूमिका मांडणार ? असे उलटसुलट प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. त्यामुळे ओबीसी व मराठा बांधवांसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लक्ष उद्याच्या आंदोलनाकडे लागले आहे.

error: Content is protected !!