युवामोर्चा जिल्हाध्यक्ष समिल जळवी यांचे आवाहन
कुडाळ : महाराष्ट्र राज्यात सध्याच्या परिस्थितीत समाजातील आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.याच पार्श्वभूमीवर जिल्हा ओबीसी 52% आरक्षित समाज बांधवानी ओबीसी महासंघाच्या माध्यमातून 23 व 24 सप्टेंबर रोजी कुडाळ शहरातील जिजामाता चौक येथे लाक्षणिक दोन दिवशीय उपोषण व धरणे आंदोलन छेडण्यात येत असल्याचा ईशारा ओबीसी समाज बांधवानी दिला आहे.या आंदोलनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, मालवण,सावंतवाडी,वेंगुर्ला, दोडामार्ग,कणकवली, देवगड,वैभववाडी या आठही तालुक्यातील भंडारी समाज्यातील भंडारी समाज बांधवांनी आपल्या (ओबीसी आरक्षणाला) कोणत्याही प्रकारचा धक्का लागु नये यासाठी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन भंडारी युवामोर्चा जिल्हाध्यक्ष श्री.समिल प्रभाकर जळवी यांनी केले आहे.
महाराष्ट्रात सध्या आरक्षणाचा मुद्दा खूप चर्चेत आहे.केवळ ओबीसीच नव्हे तर इतर आरक्षित समाजातील लोकही आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरले आहेत.भारतीय संविधानाने दिलेला शैक्षणिक,सामाजिक,शासकीय आणि राजकीय आरक्षणाचा हक्क वाचवण्यासाठी,जिल्हा-जिल्ह्यातून ओबीसी समाजाचे लोक आपली नाराजी व्यक्त करत आहेत.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवून दिलेला आरक्षणाचा हक्क पूर्णपणे नाहीसा करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप अनेक संघटना करत आहेत.त्यामुळे वेळीच एकत्र येऊन या प्रयत्नांना विरोध करणे आवश्यक आहे,असे या संघटनांचे मत आहे.अन्यथा संपूर्ण बहुजन समाजासमोर भविष्यात पुढे मोठे संकट उभे राहू शकते त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओबीसी,एसबीसी, एससी, एसटी, व्हीजे, एनटी असे एकूण ५२ टक्के पेक्षा जास्त आरक्षित समाज आहे.या सर्व समाजांनी महाराष्ट्रात सुरू असलेल्या ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे.या पाठिंब्याची जाणीव महाराष्ट्र सरकारला करून देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी आणि आरक्षित समाज महासंघाने हे आंदोलन जाहीर केले आहे.या आंदोलनात जिल्ह्यातील भंडारी समाज बांधवांनी सहभागी होऊन आपल्या आरक्षणाचे रक्षण करण्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भंडारी युवामोर्चा जिल्हाध्यक्ष श्री.समिल प्रभाकर जळवी यांनी आपल्या भंडारी समाज बांधवाना केले आहे.














 
	

 Subscribe
Subscribe









