कोलगाव ओहोळात आढळली भलीमोठी मगर

सावंतवाडी : येथील मोती तलावातील असणारी मगर पकडून अन्य ठिकाणी सोडलेली घटना ताजी असताना कोलगाव आयटीआय परिसरात असलेल्या ओहोळामध्ये भली मोठी मगर आज दिसून आली आहे. तेथील स्थानिक युवक परेश बावकर व त्यांच्या सहकाऱ्यांना ही मगर दिसली. त्यांनी ती आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आहे. तिला पाहण्यासाठी जमलेले युवक पुढे गेल्यानंतर त्या मगरीने पाण्यात पळ काढला. मात्र ती कॅमेऱ्यात कैद झाल्यामुळे सर्वांना पाहण्याची संधी उपलब्ध झाली आहे. यावेळी दिपेश धुरू, नागेश सावंत, विनोद दळवी, रविंद्र चौगुले आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!