पतंजली योग समिती सिंधुदुर्ग यांची मासिक बैठक संपन्न

आज दिनांक 20 सप्टेंबर 2025 रोजी महिला पतंजली योग समिती सिंधुदुर्ग यांची मासिक बैठक कुडाळ येथे पार पडली त्यात महिला पतंजली योग समिती सिंधुदुर्ग चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी महिला पतंजली जिल्हा प्रभारी सौ.रश्मी आंगणे महामंत्री सौ.प्रिया कोचरेकर,कोषाध्यक्ष सौ.तृप्ती तोरसकर,संघटनमंत्री सौ.दिपश्री खाडिलकर ही महिला जिल्हा कार्यकारिणी उपस्थित होती.तसेच महिला पतंजली तालुका प्रभारी सौ. प्रतिभा सामंत उपस्थित होत्या.
या बैठकीत श्रेया बांदेकर,शिल्पा पडते,निशा कडावलकर,दीप्ती ठाकूर,मृणाली गवंडे, श्रेया आळवे,तृप्ती सावंत,स्नेहल कडोलकर या महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.उपस्थितांमधून कुडाळ तालुका महिला पतंजली योगसमितीची नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली.ती पुढीलप्रमाणे
तालुका प्रभारी-प्रतिभा सामंत
महामंत्री-श्रेया बांदेकर
संघटनमंत्री-शिल्पा पडते
कोषाध्यक्ष-निशा कडावलकर
सोशलमीडिया प्रभारी-कविता कुंटे
संपर्क प्रमुख-दीप्ती ठाकूर
युवती प्रभारी-श्रेया आळवे
बैठकीत सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले.

error: Content is protected !!