झाराप ए. टी. एम. फोडी प्रकरणातील ५ आरोपींना कुडाळ पोलिसांकडून अटक

कुडाळ : झाराप ए. टी. एम. फोडी प्रकरणातील ५ आरोपींना कुडाळ पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक १८/०९/२०२५ रोजी रात्री ०२:३५ वाजण्याच्या सुमारास नवी मुंबई येथुन मो.नं ७५०६७१३११६ वरुन कुडाळ पोलीस ठाणेच्या लॅण्ड लाईन फोनवर फोन करुन झाराप येथील बँक ऑफ इंडीयाच्या बाजुलाच असलेल्या एटीएममध्ये संशयास्पद हालचाली दिसत असल्याचे सांगीतले. मिळालेल्या बातमीवरुन नाईट पेट्रोलींगला असलेले अधिकारी व अंमलदार यांना तात्काळ झाराप येथील बँक ऑफ इंडीयाच्या एटीएममध्ये दाखल झाले. त्याठिकाणी ATM रुममध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याला सफेद रंगाची चिकटपट्टी व हॅण्डग्लोज चिकटलेला दिसून आला व बाहेरीस सीसीटीव्ही कॅमेऱ्याची वायर काढलेली दिसुन आली. त्यानंतर पोलीसांनी आजुबाजुला शोध घेतला असता, ATM च्या बाजुला एक ऑक्सीजन गैस सिलेंडर, एक LPG सिलेंडर व गॅस कटर असे साहित्य मिळुन आले. त्यानंतर बँकेतील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करता, ATM मध्ये ०२ इसमांच्या संशयीत हालचाली दिसुन आल्याने बँकेचे अधिकारी गुरुप्रीत परमजीत सिंह यांनी बैंक ऑफ इंडीया शाखा झाराप चे ATM फोडण्याचा प्रयत्न केलेप्रकरणी दिले फिर्यादीवरुन कुडाळ पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि नं ३१८/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३३१ (४), ३०५, ६२, ३ (५) प्रमाणे दोन अज्ञात इसमांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

गुन्हयाच्या घटनास्थळी मिळुन आलेला मुद्देमाल व तांत्रीक विष्लेषणाव्दारे पाहिजे आरोपीत हे इंदापुर जि. पुणे येथील असल्याचे उघड झाले. त्यानंतर त्याठकाणी तात्काळ कुडाळ पोलीस ठाणेचे सहा. पोलीस निरीक्षक, जयदीप पाटील व पोलीस अंमलदार यांना पुणे इंदापुर येथे रवाना केले. त्याठिकाणी गुन्हयातील आरोपी १) किरण बाळु चव्हाण वय-29 वर्षे, रा. वनगळी ता. इंदापुर, जि. पुणे 2) विजय दिनानाथ जाधव वय 19 वर्षे, रा. वनगळी ता. इंदापुर, जि. पुणे 3) मारुती गोविंद सुरवसे वय-19 वर्षे, सध्या रा. वनगळी ता. इंदापुर, जि. पुणे, मुळ रा. कोराळ ता. उमरगा, जि. उस्मानाबाद 4) समाधान शहाजी यादव वय-27 वर्षे, रा. बाबुळगाव ता. इंदापुर, जि. पुणे 5) औदुंबर राजकुमार शेलार वय-27 वर्षे, रा. पळसदेव ता. इंदापुर जि. पुणे यांना त्यांचे राहते घरातुन ताब्यात घेण्यात आलेले आहे. त्यांचेपैकी आरोपी किरण बाळु चव्हाण याचे अंगझडतीमध्ये SBI बँकेची 12 ATM कार्ड, HDFC बँकेची 03 ATM कार्ड, कर्नाटका बँकेची 02 ATM कार्ड, युनियन बँकेची 02 ATM कार्ड, कॅनरा बँकेची 03 ATM कार्ड तसेच बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडीया, आयडीबीआय बँक, एक्सीस बैंक, कोटक बँक यांची प्रत्येकी 01 ATM असे एकुण 27 ATM कार्ड, 02 मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत. आरोपी क्रमांक 04 समाधान शहाजी यादव याचे अंगझडतीत 01 मोबाईल व आरोपीत क्रमांक 05 औदुंबर राजकुमार शेलार याचे अंगझडतीत 01 मोबाईल जप्त करण्यात आलेला आहे. तसेच आरोपीत यांनी गुन्हयात वापरलेली एक ईटींगा कार क्रमांक MH 12 XQ 2697, 01 पल्सर मोटार सायकल (रजीस्ट्रेशन नंबर नाही), एक ऑक्सीजन गैस सिलेंडर, एक LPG सिलेंडर व गॅस कटर असे जप्त करण्यात आलेले आहेत.

सदर गुन्हयात एकुण 05 आरोपीत यांना अटक करण्यात आलेली असुन त्यांचेकडे गुन्हयाच्या अनुषंगाने अधिक तपास चालु आहे. सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग डॉ. मोहन दहिकर, मा. अपर पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग कु. नयोमी साटम, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सावंतवाडी विनोद कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम कुडाळ पोलीस ठाणे, सपोनि / वैशाली आडकुर, सपोनि/ जयदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक/ प्रविण धडे, मसपोफो/939 जाधव, पोहेको/1011 बंडगर, पोहेकॉ/120 कदम, पोहेकॉ/744 वेंगुर्लेकर, पोहेकों/1113 बांदेकर, पोहेकॉ/703 पाटील, पोना/1197 गुरव, पोकों/184 गणेश चव्हाण, पोकों/405 भोई, पोकों/473 मळगावकर, मपोकॉ/1296 भागवत सर्व कुडाळ पोलीस ठाणे यांनी केलेली आहे. तसेच नमुद पथकास गुन्हयाची उकल करणेकामी आवश्यक तांत्रीक मदत सायबर पोलीस ठाणे सिंधुदुर्ग व त्यांचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक प्रविण कोल्हे यांनी केलेली आहे.

error: Content is protected !!