कुडाळ आर.एस.एन. हॉटेल समोरील पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालक त्रस्त

कुडाळ : येथील आर.एस.एन. हॉटेल समोरील सर्विस रोडवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

मुंबई – गोवा मार्गावरून वाहनांची नेहमीच वर्दळ सुरू असते. सावंतवाडीहून कुडाळला येण्यासाठी किंवा कुडाळहून सावंतवाडीला जाण्यासाठी याच मार्गाचा उपयोग करावा लागतो. या खड्ड्यांमध्ये वाहने आदळून वाहनांचे नुकसान होत असल्यामुळे वाहन चालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. शिवाय या मार्गावर वाहनांची नेहमीच वर्दळ असल्यामुळे अपघात होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लवकरात लवकर या खड्ड्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी सध्या वाहनचालकांमधून होत आहे.

error: Content is protected !!