दोडामार्ग : तिलारी येथे शेटवेवाडी नजीक मुख्य रस्त्यावर आज दुपारी भीषण अपघात झाला. महिंद्रा पिकअप व मोटारसायकलमध्ये झालेल्या जोरदार धडकेत मोटारसायकलस्वार युवकाचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, MH 07 AF 0228 या क्रमांकाच्या मोटारसायकलवरून युवक दोडामार्ग कडे जात होते तर बेळगाव कडे जाणारी समोरून येणाऱ्या महिंद्रा पिकअप वाहनाशी जबर धडक झाली. या धडकेत युवकाच्या डोक्याचा चेंदा मेदा झाला आणि कु. राहुल दिलीप वरक वय 20 वर्षे रा. कुब्रल मोयची वाडी येथील ह्या युवकाचा जागीच मृत्यू झाला. तर सोबत असलेला युवक विठ्ठल घारे वय 19 वर्षे हा जखमी झाला त्याला दोडामार्ग रुग्णालय येथे दाखल केले असून उपचार सुरु आहे त्याला अधिक उपचारा साठी गोव्यात हलविण्यात आले आहे मात्र युवक रुग्णालय दाखल केले असता मृत जाहीर करण्यात आले आहे अधिक तपास दोडामार्ग पोलीस करत आहे