माजी आमदार वैभव नाईक यांना निवजे गावात धक्का

कट्टर समर्थक समजले जाणारे ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण उर्फ भाई कदम शिवसेनेत

आ. निलेश राणे आणि दत्ता सामंत यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून केला शिंदे गटात प्रवेश

कुडाळ : माजी आमदार वैभव नाईक यांना निवजे गावात मोठा धक्का बसला असून त्यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण उर्फ भाई कदम यांनी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उपनेते संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, महिला जिल्हाध्यक्ष दिपलक्ष्मी पडते, जिल्हा सचिव दादा साईल, उपजिल्हा प्रमुख अरविंद करलकर, माजी जिल्हापरिषद अध्यक्ष संजय पडते, युवासेना उपजिल्हाप्रमुख स्वरूप वाळके, विभागप्रमुख नागेश आईर, आना भोगले, विजय जाधव, सीताराम चव्हाण, तातू लाड, साईनाथ पालव, युवासेना तालुकाप्रमुख अनिकेत तेंडुलकर, विश्वास पांगुळ, अमित तावडे, विठ्ठल शिंदे उपथित होते.

यावेळी शाखा प्रमुख नियुक्ती देखील करण्यात आली. वेताळबांबर्डे साठी सुनील गायकवाड व निलेश बांबर्डेकर, आवळेगावसाठी मनोरंजन सावंत, कडावल चेतन मोरजकर, पांग्रड अमोल मर्गज, तसेच शिवसेना तालुका समन्वयक म्हणून प्रवीण मर्गज यांची नियुक्ती करण्यात आली. याप्रसंगी शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!