नानेली माणगाव पुलावर पडलेला खड्डा सिमेंट काँक्रिट करून बुजवला

शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उबाठा सेनेकडून स्तुत्य कार्यक्रम

ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त

माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उ. बा. ठा) पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवजी ठाकरे यांचा वाढदिवस समाजपयोगी कार्याने साजरा करण्याच्या उद्देशाने युवासेना नानेलीच्या माध्यमातून नानेली-माणगाव जोडणाऱ्या कालिकामंदिर पुलावर पडलेला भलामोठा खड्डा सिमेंट काँक्रीट करून बुजवण्यात आला.


नानेली मधील ग्रामस्थांना दळणवळणा साठी दुसरा कोणताही पर्यायीमार्ग नसल्यामुळे याच पुलावरून रोज ये-जा करावी लागते. पुलाच्या मध्यभागीच मोठा खड्डा असल्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. हीच समस्या लक्षात घेऊन युवासेना (उ. बा. ठा.) नानेली पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज संपूर्ण खड्डा सिमेंट क्रॉंक्रीटने बुजवला. तसेच पुलाखाली मोठ्या प्रमाणात साचलेल्या कचऱ्यामुळे अगदी थोड्या पावसानेही पुलावरून पाणी वाहत होते म्हणून कचरा साफ करून पुलाचे पाईप मोकळे कऱण्यात आले. या कामांमुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. या कामासाठी ग्रा. पं. सदस्य आणि युवासेना शाखाप्रमुख विनय कदम, रोहित धुरी, मच्छिंद्र धुरी, प्रकाश मेस्त्री, ऋतिक धुरी आणि साहिल कदम उपस्थित होते.

error: Content is protected !!