कुडाळ : सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने आपल्या बाजूच्याच केरवडे गावच्या पूर्ण प्राथमिक शाळेच्या १६ गरजू विद्यार्थ्यांना प्रत्येकी अर्धा डझन वह्या आणि चार पेनांच वाटप करण्यात आले. दुर्ग संवर्धन आणि स्वच्छता मोहिमे सोबत सह्याद्री प्रतिष्ठान विद्यार्थी अकादमी यांच्यावतीने हे कार्य करण्यात आले. यावेळी त्या गावचे सरपंच, उपसरपंच आणि सह्याद्री प्रतिष्ठानचे राजेंद्र गोसावी विक्रांत गावडे, अक्षय कासले हे पण उपस्थित होते.