श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय चेंदवण येथे रोडरी क्लब मार्फत आयडियल स्टडी ॲप चे वितरण

कुडाळ : श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय चेंदवण येथे शुक्रवार दिनांक 25/07/2025 रोजी दुपारी ठीक 3.15 वाजता रोटरी क्लब ऑफ कुडाळ च्या वतीने इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना आयडियल स्टडी ॲप चे वितरण करण्यात आले .या कार्यक्रमास रोटरी क्लबचे अध्यक्ष श्री.राजीव पवार ,सचिव श्री.मकरंद नाईक असिस्टंट गव्हर्नर श्री.सचिन मदने , शाळा समिती सदस्य श्री.संजय नाईक, मुख्याध्यापक श्री.माणिकपवार,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री.माणिक पवार यांनी केले त्यांनी संस्थेचे कार्य व प्रशालेमध्ये राबविले जाणारे विविध प्रकारच्या उपक्रमाविषयी माहिती दिली.विद्यालयाच्या वतीने प्रमुख मान्यवरांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. रोटरीचे असिस्टंट गव्हर्नर श्री. मदने सर यांनी आयडियल स्टडी ॲप कसे वापरावे याबद्दल सविस्तर माहिती दिली याचा जास्तीत जास्त वापर करून विद्यार्थ्यांनी एस.एस.सी.परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळवावे असे सांगितले. दहावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना मिळालेले जास्तीत जास्त गुण बघून आम्हाला सत्कार करण्याची संधी द्यावी असेही आपल्या भाषणातून म्हणाले. रोटरी क्लब ऑफ कुडाळ चे सचिव श्री.नाईक यांनी एक ऐतिहासिक गोष्ट सांगितली व रोटरीचे कार्य अशा प्रकारे स्वतःच उद्योग व्यवसाय सांभाळून समाजामध्ये मदतीचे असे कार्य चालते असे सांगितले.अध्यक्ष श्री पवार यांनी ॲपच नव्हे तर इतरही काही सुविधा देण्याचा आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करू असे जाहीर केले आणि सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी शाळा समिती सदस्य श्री संजय नाईक यांनी रोटरी क्लबचे संस्थेच्या वतीने आभार व्यक्त केले व विद्यार्थ्यांनी या आयडियल स्टडी ॲपचा जास्तीत जास्त चांगला उपयोग करावा असे आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना संबोधित केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ. सिद्धी शिरसाट यांनी केले व आभार सौ. उर्मिला गवस यांनी मानले.

error: Content is protected !!