कुडाळ : शुक्रवार दिनांक 25 जुलै 2025 रोजी भारतीय जनता पक्ष यांच्या वतीने मा.श्री.रवींद्र चव्हाण साहेब यांच्या सौजन्याने कुडाळ तालुका पदाधिकारी यांच्यामार्फत प्रशालेत शालेय विद्यार्थ्यांसाठी 30 डझन वह्या प्राप्त झाल्या आणि त्या वह्यांचे वाटप आज रोजी करण्यात आले.
याप्रसंगी शाळा समिती अध्यक्ष श्री देवेंद्र नाईक तसेच शाळा समिती सदस्य श्री संजय नाईक यांच्या उपस्थितीत चेंदवण उपसरपंच श्री.माधव ,ग्रामपंचायत सदस्य श्री.नारायण शृंगारे,सौ पोयरेकर,सौ. मेस्त्री, तंटामुक्ती अध्यक्ष भूपेश चेंदवणकर,अण्णा भरडकर , बाळू कोचरेकर त्याचबरोबर इतर मान्यवरांच्या उपस्थितीत प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांना या वह्यांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद नाईक यांनी केले.कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक श्री माणिक पवार यानी केले आत्मविश्वास, सातत्य,एकाग्रता आणि अथक परिश्रमाने आपले ध्येय प्राप्त करा असा संदेश दिला , पक्षाचे व पदाधिकारी यांचे प्रशालेच्या व संस्थेच्या वतीने आभार मानले आणि अशाच प्रकारे शाळेला व शालेय विद्यार्थ्यांना मदत मिळावी अशी आशा व्यक्त केली.
पक्षाचे कार्यकर्ते ग्रामपंचायत सदस्य श्री. नारायण शृंगारे यांनी आपल्या परीने जास्तीत जास्त सहकार्य केले जाईल असे आश्वासन दिले. शाळा समिती सदस्य श्री संजय नाईक यांनी आपले मनोगत व्यक्त केले, संस्थेच्या वतीने,कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.