कुडाळ : कुडाळ तालुक्यातील भैरववाडी येथील २१ वर्षीय ध्रुवराज उर्फ राज सुनील राऊळ हा तरुण १२ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून घरात कोणालाही काहीही न सांगता निघून गेला आहे. कुडाळ पोलीस ठाण्यामार्फत नागरिकांना ध्रुवराजला शोधण्यासाठी मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. ध्रुवराज उर्फ राज सुनील राऊळ हा २१ वर्षांचा असून, तो भैरववाडी, कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग येथील रहिवासी आहे. त्याच्याबद्दल काहीही माहिती मिळाल्यास, कृपया तात्काळ खालील क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.