उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उंबर्डे शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप

वैभववाडी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या आदेशानुसार तसेच वैभववाडी तालुका अध्यक्ष वैभव रावराणे नेतृत्वाखाली यांच्या उंबर्डे माध्यमिक शाळा येथे केक कापून तसेच मुलांना शैक्षणिक वस्तू व खाऊवाटप करण्यात आले. प्रशाळेच्या परिसरात वृक्षरोपण करण्यात आले. यावेळी तालुका अध्यक्ष वैभव रावराणे, उपाध्यक्ष रमेश मोपेरकर,ओबीसी तालुका अध्यक्ष शशि मुद्रस, भागीरथ प्रतिष्ठानच्या सौ. दिपाली खैरतोडे, मुख्याध्यापक राठोड सर,जिल्हा शिक्षण विभागाचे सुजित चितळे,पाटील सर, युवक तालुका सरचिटणीस शैलेश साळवी, मोहन लसणे, वैभव सुतार उपस्थित होते.

error: Content is protected !!