कुडाळ : नगरपंचायत महिला व बालकल्याण विभागातर्फे कुडाळ शहरातील बॅ.नाथ पै. विद्यालय मध्ये सॅनिटरी वेंडिंग मशीन महिला बालकल्याण निधी 2024 25 मधून बसवण्यात आली. या मशीनचे उद्घाटन कुडाळच्या नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता शिरवलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी नगरसेविका सौ.उषाआठले मॅडम यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी महिला बालकल्याण सभापती सौ.आफरीन करोल, नगरसेविका चांदणी कांबळी श्रेया गवंडे संध्या तेरसे, शाळेचे मुख्याध्यापक राठोड सर इतर सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होत्या.