जिल्हास्तरीय Tinkering Compitition या स्पर्धेत माध्य. विद्यालय मांडकुली – केरवडे हायस्कुलचा द्वितीय क्रमांक

National Stem Program मार्फत स्पर्धेचे आयोजन

कुडाळ : मागासवर्गीय एज्यूकेशन सोसायटी संचलित, प. पू. आप्पासाहेब पटवर्धन माध्य.विद्यालय मांडकुली- केरवडे हायस्कूलचे National Stem Program मार्फत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय Tinkering Compitition या गटातील स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला.

18 जुलै 2025 रोजी माऊली माध्यमिक विद्यालय सोनूर्ली येथे National Stem Program मार्फत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय Tinkering Compitition स्पर्धेत प.पू. आप्पासाहेब पटवर्धन माध्य विद्यालय मांडकुली- केरवडे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले आहे. इयत्ता आठवीतील कुमार विश्राम साबाजी कदम तसेच इयत्ता नववीतील कुमार मयूरेश कृष्णा भोई व कुमार गणपत लक्ष्मण घाडी यांनी या स्पर्धेत सहभाग घेऊन द्वितीय क्रमांक पटकावला व त्यांना मार्गदर्शन करणारे प्रशालेचे विज्ञान शिक्षक श्री राहुल रविंद्र कानडे यांचे अभिनंदन प्रशालेचे संस्था अध्यक्ष श्री. श्रीधर पेडणेकर, संस्था सचिव श्री. अंकुश जाधव, खजिनदार श्री. देवदत चुबे, संस्था उपाध्यक्ष श्री. अर्जून परब, कार्याध्यक्ष श्री. वामन गावडे व मुख्याध्यापक श्री सुरेंद्र खोत सर्व संचालक, सभासद ,ग्रामस्थ, माजी विद्यार्थी, पालक,व सर्व शिक्षणप्रेमी यांजकडून अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!