श्रमिक कामगार संघटना पदाधिकारी यांनी घेतली मुख्य कार्यकारी अधिकारी व कामगार अधिकारी यांची भेट.

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांधकाम कामगार यांच्या विविध प्रश्नाबाबत चर्चा करण्यासाठी कामगार अधिकारी श्री. खांडेकर यांची भेट श्रमिक कामगार संघटना अध्यक्ष श्री. प्राजक्त चव्हाण व संघटना पदाधिकारी यांच्या समवेत बैठक संपन्न झाली. बांधकाम कामगार यांची नवीन नोंदणी तसेच शिष्यवृत्ती क्लेम वर्षभर पेंडिंग आहेत ते अर्ज लवकर तपासणी करून कामगार यांचे लाभ मिळण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. कामगार अधिकारी यांनी सदर पेंडिग अर्ज लवकरच निकाली काढण्यात येतील असे आश्वासित केले. त्याच प्रमाणे 60 वर्ष झालेल्या कामगार यांना पेन्शन योजना संदर्भात येणाऱ्या त्रुटी यांचीही चर्चा करण्यात आली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांधकाम कामगार यांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती देण्यात येत आहे सदर 1ली ते 12 वी पर्यंत च्या शिष्यवृत्ती साठी सद्यस्थितीत P.E.N ID व आवश्यक आहे परंतु बऱ्याच प्राथमिक शाळेमध्ये छापील बोनाफाईड तसेच पेन नंबर नमूद करून मिळत नसल्याने कामगार वर्गाला शाळेमध्ये हेलपाटे मारावे लागत आहे त्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्हयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. खेबुडकर साहेब यांची भेट घेऊन छापील बोनाफाईड वर पेन नंबर नमूद करण्याची विनंती श्रमिक कामगार संघटनेच्या माध्यमातून करण्यात आली. यावेळी श्रमिक कामगार संघटना अध्यक्ष श्री प्राजक्त चव्हाण, जिल्हा पदाधिकारी सौ. संजना पाटकर. सौ. अंतरा गावडे, श्री वामन गावडे, श्री.दिनेश बळी, सौ. रसिका कदम, सौ. दिपश्री परब, श्री. दत्ताराम वारंग, सौ. भरणकर व संघटना कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!