कुडाळ : तालुक्यातील सर्व संगीत, वारकरी भजनी बुवा,पखवाज वादक, झान्ज वादक, कीर्तनकार, व अन्य भजनी क्षेत्रातील कलाकारांना नम्र विनंती करण्यात येते की, नुकतीच आपली सर्वांची “भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्ग “या नावाने संस्था उदयास आली आहे. व तिला शासन दरबारी मान्यता देखील मिळाली आहे. या संस्थेचे आपले सर्वांचे परिचित असणारे अध्यक्ष श्रीमान. संतोषजी कानडे बुवा व त्यांचे मान्यवर पदाधिकारी , आपल्या भेटीसाठी कुडाळ (ओरोस) येथे दिनांक – 20/07/2025 रोजी दुपारी 3.00 वाजता येणार आहेत. आपल्या भजन क्षेत्रातील असणाऱ्या समस्या उदा. कलाकार मानधन, विमा योजना, कलाकार ओळखपत्र, भजन परंपरा संवर्धन व जतन, अश्या विविध प्रश्नावर चर्चा करणे व त्यातून मार्ग काढणे संदर्भात शासन दरबारी पाठपुरावा करणेसाठी आपल्या सर्वांबरोबर विचार विनिमय करणार आहेत. तरी सदर सभेस आपणा सर्वांची उपस्थिती वंदनीय आहे.
सभेचे ठिकाण :
रवळनाथ मंदिर ओरोस
आपला कृपाभिलाषी
बुवा. श्री ज्ञानदेव मेस्त्री
(उपाध्यक्ष,भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्ग)
बुवा. रवी कदम
(सदस्य)
बुवा. योगिता पवार
(भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्ग)