शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालाय साळगाव मध्ये रानभाज्या प्रदर्शनाचे आयोजन

विद्यार्थ्यांना आपल्या परिसरातील रानभाज्याची ओळख व्हावी पावसाळ्याच्या दिवसात मुबलक प्रमाणात उपलब्ध होणाऱ्या रानभाज्याचा वापर आपल्या आहारामध्ये करावा या उद्देशाने शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालाय साळगाव मध्ये दरवर्षी रानभाज्या प्रदर्शनाचे आयोजन केले जाते चालू वर्षी हे प्रदर्शन शनिवार दिनांक १९ जुलै २०२५ रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे.या प्रदर्शनाच्या निमित्ताने श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगांवच्या उच्च माध्यमिक विभागाच्या सहा.शिक्षिका सौ.देवयानी टेमकर या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तरी या प्रदर्शनाचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन प्रशालेचे मुख्याध्यापक श्री सलीम तकीलदार यांनी केले आहे.

error: Content is protected !!