अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्गच्या वतीने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

कुडाळ : अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्गच्या वतीने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन पणदूर हायस्कुल सभागृह, पणदूर तिठा, कुडाळ मुंबई गोवा हाईवे येथे करण्यात आले आहे. हे शिबीर निशुल्क असून श्री सत्यवान रेडकर (कनिष्ठ अनुवाद अधिकारी,सीमाशुल्क विभाग मुंबई, भारत सरकार) यांचे मार्गदर्शन लाभणार आहे तरी सर्व ९ वी ते १२ वी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचा मोठया संख्येने सहभाग नोंदवत लाभ घ्यावा असे आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्ग यांच्या वतीने करण्यात आले आहे.


https://www.facebook.com/share/p/1GdWnAgx6G/?mibextid=wwXIfr

error: Content is protected !!