कुडाळ एमआयडीसीमध्ये रात्रीच्या गैरप्रकारांना चाप

१४ जणांवर कारवाई, १२ जणांना दंड

कुडाळ : कुडाळ एमआयडीसी (महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ) परिसर शहरापासून काहीसा दूर असल्याने, सायंकाळच्या आणि रात्रीच्या वेळी बंद कंपन्यांच्या निर्जन ठिकाणी दारू पार्ट्या आणि मौजमजा करण्याचे प्रकार वाढले होते. यामुळे गंभीर गुन्हा घडण्याची शक्यता निर्माण झाली होती.

या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती नयोमी साठम यांनी परिसरात गस्त वाढवण्याचे आदेश दिले होते. कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी गस्त वाढवली.

१४ जणांवर कारवाई, १२ जणांना दंड

गस्तीदरम्यान, कुडाळ पोलिसांनी एमआयडीसी परिसरात असभ्य वर्तन करताना आढळलेल्या खालील १४ जणांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ११०/११७ नुसार कारवाई केली:

१. राजेश किशोर चव्हाण (रा. नेरुर, ता. कुडाळ)
२. साजीद लतिफ रहमान कुल्ली (रा. पिंगुळी)
३. शुभम प्रकाश चव्हाण (रा. कुडाळ)
४. प्रकाश आनंद रजपुत (रा. केळबाईवाडी, कुडाळ)
५. राजेंद्र लक्ष्मण साळकर (रा. साळेल, मालवण)
६. साईराज दत्तात्राय तेली (रा. कुडाळ)
७. राहुल राजाराम पाटील (रा. कुडाळ कुंभारवाडी)
८. ओंकार विजय पांचाळ (रा. पिंगुळी)
९. अनिरुद्ध विश्वास गवंडे (रा. पिंगुळी)
१०. आसिफ आदम शेख (रा. नेरुर)
११. संदेश सुभाष सावंत (रा. आंदुर्ले)
१२. प्रवीण गणपत सावंत (रा. ओरोस)
१३. सुशांत सुभाष सावंत (रा. आंदुर्ले)
१४. केतन चंद्रकांत चव्हाण (रा. पिंगुळी)

या सर्वांवर खटले दाखल करून त्यांना कुडाळ प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने यापैकी १२ जणांना प्रत्येकी १२०० रुपये दंड ठोठावला.

चोरी आणि गैरप्रकारांमध्ये घट

पोलिसांच्या या कारवाईमुळे एमआयडीसी परिसरातील चोरी आणि इतर गैरप्रकारांमध्ये घट झाल्याचे दिसून येत आहे. यापूर्वीही अशा अनेक जणांवर कारवाई करण्यात आली आहे. सुरुवातीला या परिसरात महिला आणि तरुणींचाही वावर मोठ्या प्रमाणात होता, परंतु पोलिसांच्या कारवाईनंतर त्यात घट झाली आहे.

कुडाळ पोलिसांनी अशा प्रकारच्या कारवाईत सातत्य ठेवणार असल्याचे सांगितले आहे. यामुळे परिसरातील शांतता आणि सुव्यवस्था राखण्यास मदत होईल.

error: Content is protected !!