कुडाळ तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींसाठी आरक्षण जाहीर

कुडाळ : तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतचे सन २०२५-३० या कालावधीसाठीचे सरपंच आरक्षण सोडत कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी जाहीर केले. या आरक्षण सोडती मुळे काही इच्छुक उमेदवारांच्या मनासारखी आरक्षणे न पडल्यामुळे काहींचे चेहरे उदास झाले तर काहींना अपेक्षेप्रमाणे आरक्षण पडल्यामुळे अनपेक्षित सुखद धक्का बसला ते आनंदीत झाल्याचे चित्र सभागृहात दिसून आले. काही इच्छुकांनी तर फोनवरूनच आरक्षणाची माहिती घेतली.

कुडाळ येथील सिद्धिविनायक हॉलमध्ये मंगळवारी सरपंच आरक्षण सोडत कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे यांच्या प्रमुख उपस्थितीत कुडाळ पडतेवाडी शाळेमधील इयत्ता पहिली मधील ऋत्वी रुपेश धुरी व चैत्राली अविनाश वारंग या दोन मुलींच्या हस्ते सरपंच आरक्षण सोडतीची चिठ्ठी काढण्यात आली.

आरक्षण सोडत पुढीलप्रमाणे

अनु. जाती (महिला) बांबुळी, वाडीवरवडे, आंबडपाल, अनु. जाती सर्वसाधारण- रानबांबुळी, निरूखे, अनुसूचित जमाती- आंब्रड, नागरीकांचा मागास प्रवर्ग – घोटगे, वसोली, ओरोस बुदुक, हुमरमळा-वालावल, माडयाचीवाडी, गोठोस, पुळास, कसाल, केरवडे तर्फ माणगांव, नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला- पावशी, मांडकुली, हुमरमळा-अणाव, पिंगुळी, निवजे, तुळसुली कर्याद नारुर, नानेली, माणगांव, गोवेरी, खुला प्रवर्ग भरणी, भडगाव बुद्रुक, नारुर कर्याद नारुर, गावराई, सरंबळ, तेर्सेबांबर्डे, कुपवडे, वेताळ बांबर्डे, बिबवणे, हिर्लोक, कालेली, केरवडे कर्याद नारुर, घावनळे, परबवाडा पाट, सोनवडे तर्फ कळसुली, वाडोस, नेरुर कर्याद नारुर, साळगांव, आवळेगांव, ओरोस खुर्द, डिगस, कवठी, सोनवणे तर्फे हवेली, खुला प्रवर्ग (महिला) – तेंडोली, वालावल, आंदुर्ले, झाराप, चेंदवण, पणदूर, पोखरण-कुसबे, हुमरस, कुंदे, मुळदे, पांग्रड, तुळसुली तर्फ माणगांव, शिवापूर, पडवे, कडावल, आकेरी, बांव, वर्दे, गिरगांव- कुसगाव, अणाव, जांभवडे, नेरुर देऊळवाडा.

यावेळी अमरसेन सावंत, संदिप राणे, आर. के. सावंत, नागेश आईर, अतुल बंगे, तानाजी पालव, गोठ्या चव्हाण, समाधान परब, श्री. शृगारे, सचिन धुरी, राजन भगत, विनायक राणे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

error: Content is protected !!