शिक्षण प्रसारक मंडळ झाराप पंचक्रोशी साळगावच्या शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साळगावची संस्था, माजी विद्यार्थी, शिक्षणप्रेमी, दाते, विद्यालयाचे कर्मचारी वर्ग, दानशूर व्यक्ती याच्या अर्थसहयातून साकार होत असलेल्या विद्यार्थी वाहतूक व्यवस्थेचा शुभारंभ सोहळा गुरुवार दिनांक 10 जुलै 2025 रोजी सकाळी ठीक 10.30 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर संपन्न होणार आहे.तरी या आनंद सोहळ्यास सर्व माजी विद्यार्थी व शिक्षण प्रेमी ग्रामस्थ व पालक वर्गाने उपस्थित राहावे असे आवाहन शिक्षण प्रसारक मंडळ झाराप पंचक्रोशी साळगावचे संस्था अध्यक्ष श्री मुकुंद धुरी व संस्था सचिव श्री प्रदीप प्रभूतेंडोलकर तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक श्री सलीम तकीलदार यांनी केले आहे.