Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

सकस आहारातून ॲनिमियावर मात करू – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

महिला व बाल रुग्णालयात ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत पोषण व ॲनिमिया जनजागृती कार्यक्रम संपन्न कुडाळ : पोषण आणि ॲनिमिया जनजागृती हा विषय मुली व महिलांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. अनेकदा घर आणि कामाच्या व्यापात महिला स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात, ज्याचा थेट…

पिंगुळीत ज्येष्ठांचा सन्मान अन् गुणवंतांचा गौरव;

ग्रामस्थ हितवर्धक संघाचा गुणगौरव सोहळा उत्साहात. केतन शिरोडकर /पिंगुळी : पिंगुळी ग्रामस्थ हितवर्धक संघ, मुंबई यांच्या विद्यमाने पिंगुळी गावातील ज्येष्ठ नागरिक, गुणवंत विद्यार्थी, निवृत्त शिक्षक तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गुणगौरव व सत्कार सोहळा बुधवार दि. १६ सप्टेंबर…

सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ५०० खाटांचे रुग्णालय बांधकामात दिरंगाई नको

दर्जेदार काम मुदतीत पूर्ण करण्यासाठी पालकमंत्री नितेश राणेंच्या कडक सूचना पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतला रुग्णालयाच्या बांधकामाचा मंत्रालयात आढावा सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गनगरी येथे उभारण्यात येत असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ५०० खाटांच्या रुग्णालयाच्या बांधकामाला आता अधिक गती देण्याच्या सूचना महाराष्ट्राचे मंत्री…

मालवण देवली पुलाजवळ भीषण अपघात

दोन बालकांचा मृत्यू, एक गंभीर मालवण : मालवण तालुक्यातील देवली पुलाजवळ मंगळवारी रात्री झालेल्या अपघातात दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेत आणखी एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर गोवा येथील बांबुळी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेने देवली…

दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षऱ्या माझगाव डॉकची सुमारे २७ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यात १५ हजार थेट आणि ७५ हजार अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती मुंबई : रायगड जिल्ह्यातील दिघी येथे प्रस्तावित ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूहामध्ये प्रमुख…

कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर गणेश घाटावर प्रत्यक्ष पाहणी

कुडाळ : कुडाळात काल दीड दिवसांच्या बाप्पांचे थाटामाटात विसर्जन झाले. गणेशाच्या विसर्जनाच्या वेळी कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांनी कुडाळ शहरातील गणेश घाटावर भेट देऊन विसर्जन व्यवस्था व घाटावरील परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला. गणेश भक्तांना विसर्जनाच्या वेळी कोणतीही गैरसोय होऊ नये,…

युवासेना जिल्हाप्रमुख स्वरूप वाळके यांनी घेतले कुडाळ तालुक्यातील घरगुती गणपतींचे दर्शन

कुडाळ : मंगळवारी गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी युवासेना जिल्हाप्रमुख स्वरूप वाळके यांनी कुडाळ तालुक्यातील विविध घरगुती गणपतींचे दर्शन घेतले.यावेळी गणरायाच्या चरणी मनोभावे प्रार्थना करून कुटुंबीयांशी आपुलकीने संवाद साधला. घराघरात भक्तीमय वातावरणात साजरा होणारा गणेशोत्सव हा आपल्या संस्कृतीतील श्रद्धा, संस्कार, प्रेम…

कणकवलीत प्रवाशांकडून कारचालकावर चाकूहल्ला

हुंबरट येथे थरार कणकवली : राजापूरहून गोव्याच्या दिशेने तीन प्रवाशांना घेऊन निघालेल्या कारचालकावर प्रवाशांनीच चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना कणकवली तालुक्यातील हुंबरट येथे घडली. रविवारी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास महामार्गावर हा प्रकार घडला. कारचालकाने आरडाओरड केल्यानंतर तिन्ही संशयित घटनास्थळावरून…

हळवल फाट्यावरील अपघाती वळण अखेर हायमास्टने उजळले

पालकमंत्री नितेश राणे यांच्या सुचनेनंतर तातडीने कारवाई गणेशोत्सवाच्या दिवशी महामार्गावरील धोकादायक वळण झाले प्रकाशमानकणकवली : मुंबई – गोवा महामार्गावरील हळवल फाटा येथील अपघाती वळणावर अखेर हायमास्ट दिवा कार्यान्वित झाल्याने वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या ठिकाणी सातत्याने अंधार असल्याने रात्रीच्या…

माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन

कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार, शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून दर्शन घेतले. यावेळी सौ. स्नेहा नाईक, राजवर्धन नाईक, नंदिनी नाईक, श्री सतीश नाईक व कुटुंबीय, श्री सुशांत नाईक व…

error: Content is protected !!