डिजिटल बोर्डसाठी भगीरथ संस्थेचे सहाय्य
कुडाळ : तालुक्यातील सरंबळ हायस्कूलमध्ये आज इंटरॅक्टिव्ह बोर्ड म्हणजेच डिजिटल बोर्ड बसविण्यात आला. या बोर्डची किंमत अंदाजे १ लाख ५० हजार एवढी होती. त्यातील रुपये ७० हजार ही रक्कम संस्थेने भरली आणि बाकी रक्कम भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान या संस्थेने देणगी दिली आहे.
या बोर्डामुळे मुलांना ऑडिओ व्हिजुअल शिक्षणाची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यासाठी सॉफ्टवेअरची सुद्धा सुविधा शाळेत उपलब्ध आहे. या बोर्डसाठी देणगी दिलेल्या भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान यांचे संस्थेतर्फे आभार मानण्यात आले. सर्व सदस्यांनी दाखविलेल्या सकारात्मक दृष्टिकोनाचे कौतुक करण्यात येत आहे. हा डिजिटल बोर्ड शिकवण्यासाठी शिक्षकांना मोफत प्रशिक्षणाची सुविधा सुद्धा भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान तर्फे देण्यात येणार आहे. अशी माहिती संस्थेचे सरचिटणीस राजेंद्र परब यांनी दिली.