कुडाळ लैंगिक अत्याचार प्रकरणी जामिनावर मुक्तता

संशयित आरोपीच्या वतीने ऍड. अमोल सामंत व ऍड. हितेश कुडाळकर यांचा युक्तिवाद

कुडाळ : तरुणीला जॉब जाण्याची भीती घालून तिच्या मर्जीविरुद्ध शारीरिक संबंध ठेवून याबद्दल कुणाला काही सांगितलेस तर बघ अशी धमकी दिल्याप्रकरणी संशयित आरोपी प्रमोद विजय माटवकर (वय ३५, सध्या राहणार कुडाळ हिंदू कॉलनी, मूळ रा. पोहरे तालुका देवगड) याची रु. ५० हजारांच्या जामिनावर मुक्तता केली आहे. आरोपीच्या वतीने ऍड. अमोल सामंत व ऍड. हितेश कुडाळकर यांनी युक्तिवाद केला.

कुडाळ मधील एका नामांकित आस्थापनेमध्ये पीडित तरुणी व संशयित आरोपी प्रमोद माटवकर कार्यरत होते. सदर संशयित आरोपी हा वारंवार पीडित जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असल्याचे तिने तक्रारीत म्हटले होते. दिनांक १८ एप्रिल २०२५ रोजी संशयित आरोपीने पीडित तरुणीच्या राहत असलेल्या फ्लॅटवर जाऊन तिच्याशी अश्लील चाळे केले. तसेच जॉबची धमकी देऊन तिच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. जर कोणाला सांगशील तर बघ अशी धमकी दिली असल्याची तक्रार पीडित तरुणीने कुडाळ पोलिसात दिली होती. या तक्रारीवरून संशयित आरोपीविरुद्ध कुडाळ पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 134/2025 नुसार भा.न्या.सं. कलम 63(अ), 63(ड), 64, 75(1)i, 75(1)ii ,78(1), 332(ब), 351(2) प्रमाणे दि. 02/05/2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

कुडाळ पोलीस ठाणे गुन्हा रजी. नं. 134/ 2025 च्या गुन्ह्यामधून आरोपी याची जामीनावर मुक्तता करण्यात यावी म्हणून ओरोस येथील मे. सत्र न्यायाधीश साहेब यांचे कोर्टात अर्ज केला असता आरोपी यांच्या वतीने अॅड. अमोल सुरेश सामंत, अॅड. हितेश हेमंत कुडाळकर यांनी काम पहिले. सदर कामी आरोपी याच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून घेवून मे. कोर्टाने आज रोजी आरोपी याची ५००००/- (पन्नास हजार रुपयाचा) जामिनावर आणि अटी व शर्तीवर मुक्तता करण्यात आली आहे.

error: Content is protected !!