कणकवली चोरट्यांचा सुळसुळाट डंपर नंतर आता दुचाकी गेली चोरीस

कणकवली : शहरात उड्डाणपुलाखाली बस स्टॅन्ड समोरील ब्रिज खाली लावण्यात आलेली हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर ही दुचाकी बुधवारी सायंकाळी चोरीस गेल्याची घटना घडली आहे.गाडी मालक अशोक गुरव हे वैभववाडी मध्ये एका शासकीय कार्यालयात कामाला असून ते नेहमीप्रमाणे गाडी लावून आपल्या कामास गेले होते. यावेळी संध्याकाळच्या सुमारास एका युवकाने बस स्टँड समोरील ब्रिज खाली असलेल्या गाड्यांची पाहणी केली त्यामध्ये कोणती गाडी हँडल लॉक नाही आहे याची तपासणी केली नंतर तेथे थांबून वायर काढल्या आणि गाडी चालू करून ती घेऊन निघून गेला हे सर्व चित्र सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद झाले आहे. पण या आधी काही दिवसांपूर्वी असाच एक डंपर देखील चोरट्याने चोरून नेला होता त्याचा अजून थांब पत्ता लागला नाही त्यामुळे कणकवलीत मध्ये चोरट्यांचा सुळसुळाट वाढत असल्याचे दिसून येत आहे. मात्र पोलीस प्रशासन या चोट्यांचा छडा कधी लावणार असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.

error: Content is protected !!