गौरवास्पद सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जि प पु प्राथमिक शाळा, सांगुळवाडी नं १ – महाराष्ट्रात पहिल्या पाच मधे!

माजी विद्यार्थी किशोर सुरेश रावराणे यांनी व्यक्त केले कौतुकोद्गार

ब्युरो न्यूज: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अभिमानास्पद गोष्ट जिल्हा परिषद पुर्ण प्राथमिक शाळा, सांगुळवाडी नं १ – ,ही शाळा महाराष्ट्रामध्ये पहिल्या पाच मधे आली आहे.

दरम्यान आपली शाळा महाराष्ट्रात पहिल्या ५ मध्ये आली याचा खुपच आनंद झाला आहे.असे कौतुकास्पद वक्तव्य माजी विद्यार्थी किशोर सुरेश रावराणे यांनी केले आहे.ते पुढे म्हणाले, आम्हा सांगुळवाडीकरांसाठी अभिमानास्पद आणि गौरवास्पद बाब आहे.

विविध तंत्रज्ञानाचा वापर अध्ययन- अध्यापनासाठी


जिल्हा परिषद पुर्ण प्राथमिक शाळा, सांगुळवाडी नं १ – सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेची शाळा अनेकानेक उत्तम कामगिरीसाठी चर्चेत असताना मागील पाच वर्षाचा आलेख पाहता पटसंख्या वाढ होण्यासाठी विविध उपक्रम शाळेत राबविण्यात आले आहेत. शाळा डिजिटल करण्यात आली असून विविध तंत्रज्ञानाचा वापर अध्ययन- अध्यापनात करण्यात येतो. यामुळे विद्यार्थी आनंदाने ज्ञान ग्रहण करू लागले आहेत.शालेय वातावरण आनंददायी करण्यात आले असून विद्यार्थांना शिकण्याची गोडी निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम घेण्यात येत आहे.

इस्त्रो, बंगळूर-कर्नाटक येथे अभ्यास व सहलीसाठी शाळेतील मुलांची निवड


यावेळी किशोर रावराणे पुढे म्हणाले,शाळेच्या विकासात सांगुळवाडी ग्रामस्थ विद्या प्रसारक संघ,मुंबई, पालक, माजी विद्यार्थी – विद्यार्थीनी, अनेक सामाजिक संस्था, स्थानिक ग्रामस्थ यांच्याकडून चांगलाच प्रतिसाद मिळाल्यामुळे शाळे बरोबर शिक्षण घेत असलेल्या मुलांची प्रगती होत असून शिक्षण आणि क्रिडा क्षेत्रात यश मिळाले आहे. इस्त्रो, बंगळूर-कर्नाटक येथे अभ्यास व सहलीसाठी आपल्या शाळेतील मुलांची झालेली निवड कौतुकास्पदच आहे. असेच यापुढेही यश मिळवीत राहतील.

केंद्र प्रमुख मुख्याध्यापिका सौ स्नेहलता राणे मॅडम, सर्व शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे आजी-माजी अध्यक्ष व सर्व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य,स्थानिक ग्रामस्थ या सर्वांच्या पुढाकाराने शाळेची पटसंख्या वाढ होत आहे.

शाळा विद्यार्थी नव्हे भावी सुजान नागरिक घडवत आहे

जिल्हा परिषद पुर्ण प्राथमिक शाळा सांगुळवाडी नं १ शाळेची स्थापना सन १८९२ साली झाली असून शालेय वातावरण खूपच सुंदर व आनंदायी आहे. शाळेत सर्व आधुनिक सुविधा मुलांना उपलब्ध आहेत. *शाळेत शिक्षक शिकविताना टिव्ही, मोबाईल, प्रोजेक्टर इ. साधनांचा उपयोग करतात. त्यामुळे शिकणे अगदी सोपे व परिणामकारक होते. जे विद्यार्थ्यांच्या स्मरणात चिरकाल लक्षात राहते. शाळेची गुणवत्ता उत्तम आहे. शिष्यवृत्ती परीक्षा जादा तास, मंथन परीक्षा, नवोदय परीक्षा यासाठी शिक्षक शाळेव्यतिरिक्त जादा वेळ थांबून परीक्षेची तयारी करून घेतात. शाळेच्या भौतिक सुविधा यामध्ये परसबाग, रंगमंच, मैदान, सभागृह, फिल्टर पाणी, खेळणी, इ.उत्तम सोयी उपलब्ध आहेत. विद्यार्थी शिकत नसून भावी सुजाण नागरिक ही शाळा घडवते. आमच्या गावात ही शाळा आहे याचा माजी विद्यार्थी म्हणून आम्हाला अभिमान वाटतो. असंही ते यावेळी म्हणाले.

शाळा हे माझे ज्ञानमंदिर आहे.या शाळेने मला घडविले. या शाळेत मी शिकलो, लहानाचा मोठा झालो त्याच शाळेमध्ये मी आज सांगुळवाडी ग्रामस्थ विद्या प्रसारक संघ,मुंबई च्या माध्यमातून खजिनदार म्हणून कार्यरत आहे. शाळा व त्यामधील विद्यार्थी आहेत म्हणून आम्ही शाळेशी जोडले गेलो आहोत.

शाळेतून अनेक विद्यार्थी शिकून गेले डॉक्टर,इंजिनिअर,वकील,शिक्षक,राजकीय क्षेत्रात,पोलीस दलात,सामाजिक क्षेत्रात,पत्रकारीकेत तसेच इतर क्षेत्रात अधिकारी म्हणून काम करत आहेत. शाळेची गुणवत्ता, भौतिक सुविधा, शाळेचा निकाल दरवर्षी उंचावत आहे. त्यामुळे पालक वर्ग या शाळेत पाल्याचा प्रवेश घेत आहे. पालकसंपर्क, माजी विद्यार्थी, पालकांची जागरूकता, विनामूल्य प्रवेश, सर्व शैक्षणिक सुविधा मोफत, दर्जेदार शिक्षण यामुळे दरवर्षी शाळेची पटसंख्या वाढत आहे. शाळेला लागूनच अनुदानित शाळा आहे. तरी ही पालक वर्ग आपल्या शाळेत मुलाचा प्रवेश घेत आहे. ही बाब नक्कीच कौतुकास्पद आहे.

१३२ वर्षापूर्वी या शाळेची मुहूर्तमेढ रोवणारे तेव्हाचे निस्वार्थी कार्यकर्ते प्रत्यक्ष नसले तरी अप्रत्यक्ष या यशामागे कारणीभूत आहेत हे प्रांजळपणे नमूद करावेसे वाटते. यशाच्या शिखरावर न दिसणारे एक छोटेसे बीज या शिखराखाली दडलेले असते त्याचे स्मरण करणे उचित ठरेल नामनिर्देश न करता शाळेची पायरी बांधून यशोमंदिर गाठण्याचा मार्ग दाखविणाऱ्या त्या सर्व निस्वार्थी कार्यकुशल कार्यकर्त्यांचे आपण आजच्या या आनंदाच्या दिवशी स्मरण करूया !


कोणत्याही सुयशात अनेकांचे बहुमूल्य योगदान, अनेकांच्या प्रेरणा, अनेकांच्या सद् भावना, अनेकांचे शुभाशीर्वाद व अनेकांचे दूरदृष्टी पूर्वक प्रामाणिक प्रयत्न व अथक परिश्रम असतात.शाळा स्थापनेपासून आजपर्यंत शाळा समृध्दीसाठी झटणाऱ्या सर्व शिक्षणप्रेमींप्रती मी विनम्रपणे कृतज्ञता व्यक्त करतो.
शाळेच्या आजी-माजी सर्वच शिक्षकाना नमस्कार आज तुमच्या मुळेच आपल्या शाळेला दैदीप्यमान यश मिळालेले आहे. शाळेच्या पुढील यशस्वी कारकिर्दीला सस्नेह पुर्वक खूप खूप शुभेच्छा.

error: Content is protected !!