कणकवली : शहरात नरडवे मार्गावर नगरपंचायतच्या माध्यमातून बसवण्यात आलेल्या विविध संदेश देणाऱ्या स्टॅच्यूपैकी योगासनाची पोज असलेला स्टॅच्यू कणकवलीत फिरत असलेल्या एका माथेफिरूने उखडून काढला असल्याची घटना घडली आहे. सदरची व्यक्ती ही गुरुवारी दिवस भर कणकवली शहरात नग्नवस्थेत स्थितीत फिरत असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र अशा व्यक्तींकडे पोलीस प्रशासन गांभीर्याने पाहत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या तरुणाने एक स्टॅच्यु अगदी उचलून आपल्या खांद्यावर घेतला असल्याचे मिळालेल्या फोटो मध्ये दिसून आले आहे. दरम्यान यावेळी देखील तो तरुण नग्नावस्थेतच होता.
कणकवलीमध्ये सूरज असलेल्या आशा विघातक प्रकारांकडे पोलीस यंत्रणा मात्र गांभीर्याने लक्ष देत नसल्याने असे प्रकार वाढत असल्याची चर्चा नाक्यां – नाक्यांवर सूरु होती. काही लोकांवर दगडफेक, हातात काठी घेऊन ये- जा करणाऱ्यांना मारण्याचे इशारे करत हा तरुण फिरत होता.