दोडामार्ग तालुक्यात निलाक्षी देसाई या युवतीच्या निधनाने हळहळ

दोडामार्ग : कळणे येथील प्रताप देसाई या युवकाचा बुधवारी सायंकाळी घरात वीज प्रवाह सुरू करताना शॉक लागून दुदैवी मृत्यू झाला. याच दिवशी सकाळी बांबोळी गोवा येथे कळणे येथील कु. निलाक्षी निलेश देसाई वय वर्षे २० हिचे उपचार दरम्यान निधन झाले. ती बारावी परीक्षा उत्तीर्ण झाली होती. कळणे गावात एकाच दिवशी दोन निष्पाप जीवांचा अंत झाला यामुळे दोडामार्ग तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

कळणे येथील निलाक्षी निलेश देसाई ही बारावी उत्तीर्ण झाली होती. दोडामार्ग येथे ती ब्युटी पॉलर कोर्स करीता येत होती. पण अचानक तिला काविळ होऊन रक्त पेशी कमी झाल्याने तिला तातडीने म्हापसा जिल्हा रुग्णालय येथे दाखल केले होते. नंतर तिला अधिक उपचारासाठी गोवा मेडिकल कॉलेजमध्ये पाठवले होते. त्या ठिकाणी ती बरी होत असताना प्रकृती अस्वास्थ्यामुळे तिचे बुधवारी निधन झाले. तिच्या अंत्यसंस्कार तयारी सुरु असताना कळणे गावात प्रताप देसाई या युवकाचा मृत्यू झाला. दोन्ही घटनांनी कळणे गाव शोकसागरात बुडाला आहे. निलाक्षी निलेश देसाई हिची घरची परिस्थिती बिकट आहे. आईवडील शेतकरी, एक बहीण, लहान भाऊ असा परिवार आहे.

error: Content is protected !!