शहरात वीज वाहिनीवरील झाडे हटवली
मदत कार्याबद्दल नागरिकातून समाधान
कुडाळ : मंगळवारपासून पडत असलेल्या वादळी पावसाने कुडाळ तालुक्यातही दाणादाण उडाली. जनजीवन विस्कळीत झालं. कुडाळ शहरात ठिकठिकाणी झाड विद्युत वाहिन्यांवर पडून वीज पुरवठा खंडित झाला. अशा परिस्थितीत ठाकरे सेनेची शिव आपात सेना कार्यरत झाली आहे.
कुडाळ शहरात जिथे जिथे झाड पडली तिथे आवश्यक मनुष्यबळ आणि साहित्यसह आपात सेनेचे कार्यकर्ते पोहोचून मदतकार्य करत असल्याच चित्र शहरात पाहायला मिळालं.
कुडाळ शहरात अभिनवनगर क्रमांक १ मध्ये आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमाराला मोठं जुनाट आंब्याच झाड वीज वाहिन्या आणि विद्युत खांबावर कोसळून वीजपुरवठा खंडित झाला. इतर ठिकाणी सुद्धा झाडांची पडझड झाली.
त्यानंतर नागरिकांनी शिव आपात हेल्पलाइन नंबर वर फोन केल्यानंतर त्या ठिकाणी तात्काळ शिवसैनिकांनी जाऊन सॉ कटर आणि jcb च्या माध्यमातून झाडे तोडून नागरिकांसाठी रस्ते खुले केले.
यावेळी नगरसेवक मंदार शिरसाठ, अमित राणे, गुरु गडकर, सागर जाधव, कृष्णा धुरी, लकी सावंत, मिहिर तेंडुलकर आणि स्थानिक रहिवाशांनी विशेष सहकार्य केले. शिव आपात सेनेच्या लोककार्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे.