नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी त्वरीत कार्यवाही रस्ता केला पूर्ववत
कुडाळ : गेले दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कुडाळ शहरातील भैरववाडी येथे भागीरथी कॉम्प्लेक्सच्या बाजूला झाड रस्त्यावर कोसळले होते. या झाडाबरोबर विजेच्या तारा देखील रस्त्यावर तुटून पडल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला होता. कुडाळ नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी ताबडतोब कार्यवाही करत ते झाड बाजूला केल्यामुळे रस्ता पूर्ववत झाला असून वाहतूक सुरू झाली आहे.