नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना खोचक इशारा
करूळ घाट मार्ग लवकरच सुरळीत होईल
फणसगाव येथे भाजपा देवगड तालुका कार्यकर्ता मेळावा संपन्
वैभववाडी प्रतिनिधी: कणकवली-देवगड-वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार नितेश राणे यांनी फणसगाव येथे भारतीय जनता पार्टीच्या देवगड तालुका कार्यकर्ता मेळाव्यात सहभागी होऊन कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.नितेश राणे यांच्या प्रचारार्थ खासदार नारायण राणे, विनोद तावडे यांच्या उपस्थितीत जाहीर सभा पार पडली. यावेळी बोलत असताना नितेश राणे,तरेळे कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गासाठी तब्बल ४३८ कोटी रुपये मंजूर आहेत. त्यामुळे लवकरच करूळ घाटमार्ग सुरळीत होईल. या मार्गाचे काम दर्जेदार करून घेण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करेन, असा विश्वास यांनी यावेळी व्यक्त केला.
ठाकरे शिवसेना औषधाला ही ठेवणार नाही
दरम्यान विधानसभा निवडणूक जनतेने मनावर घेतली आहे. त्यामुळे माझा विजय निश्चित असून त्या ठिकाणी ठाकरे शिवसेना औषधालाही ठेवणार नाही, असा खोचक इशारा यावेळी नितेश राणे यांनी दिला. यावेळी नितेश राणे पुढे म्हणाले, मागील दहा वर्षात आपण जबाबदारीने काम केले आहे. प्रामाणिकपणे जनतेची सेवा केली आहे. तसेच काम पुढे करेन . मतदारसंघातील प्रत्येक गावात जाऊन जनतेशी संवाद साधला आहे. जनतेचे उर्वरित समस्या जाणून घेतले. जनतेचे आशीर्वाद घेतले. यापुढे देखील पाच वर्ष संधी द्या असे आवाहन त्यांनी केले.
वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे सेवा सुरू झाल्यावर वैभववाडी समृध्द होईल
करुळ घाटा संदर्भात बोलताना नितेश राणे म्हणाले,विरोधक घाटावर बोलत आहेत. परंतु घाट सुरू करा म्हणणारे विरोधक अपघात झाल्यास याची नैतिक जबाबदारी घेणार आहेत का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. घाट लवकरच दर्जेदार स्थितीत सुरू होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. वैभववाडी – कोल्हापूर रेल्वे सेवा सुरू झाल्यावर वैभववाडीला समृद्धी येणार आहे. असे सांगितले.