कर्ली नदी किनारा संरक्षण प्रकल्पाचा देवबाग येथे शुभारंभ

मालवण : महाराष्ट्र शासन महाराष्ट्र सागरी मंडळ यांच्या माध्यमातून आशियाई विकास बँक अर्थसहाय्यीत शाश्वत पर्यावरण पूरक किनारा संरक्षण व व्यवस्थापन प्रकल्प अंतर्गत देवबाग येथे कर्ली नदीच्या किनाऱ्याचे संरक्षण करणे या कामासाठी 158 कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. या विकास कामाचा भूमिपूजन सोहळा मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत देवबाग विठ्ठल मंदिर येथे संपन्न झाला.

कर्ली नदी व देवबाग गावच्या किनाऱ्याच्या संरक्षसाठी महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार यांच्या माध्यमातून तब्बल 158 कोटी निधी मंजूर झाला. राज्याच्या अर्थसंकल्पात या निधीची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली होती. त्या नंतर तत्परतेने या कामाला सुरवात होत आहे. गतिमान विकास म्हणजे महायुती सरकार, गतिमान विकास म्हणजेच ‘राणे’ हे पुन्हा एकदा या निमित्ताने दिसून आले आहे.

मोठया प्रमाणात विकासनिधी मंजूर करून प्रत्यक्ष कामाला सुरवात होत असल्याने ग्रामस्थांच्या वतीने महायुती सरकार तसेच खासदार नारायण राणे, मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांचे आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा संघटक महेश कांदळकर, बबन शिंदे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर यांसह देवबाग ग्रामस्थ, अन्य पदाधिकारी, शासकीय अधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!