आ. निलेश राणे यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या वेताळ बांबर्डे सावंत पार्क येथील ट्रान्सफॉर्मरच्या कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न

कुडाळ : आ. निलेश राणे यांच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत मंजूर झालेल्या वेताळ बांबर्डे सावंत पार्क येथील १०० केवी ट्रान्सफॉर्मरचा शुभारंभ सोहळा शुक्रवारी संपन्न झाला. आ. निलेश राणे यांच्या माध्यमातून या ट्रान्सफॉर्मरसाठी ६ लाख ६५ हजार रुपये मंजूर करण्यात आले.

यावेळी दादा साईल, देवेंद्र सामंत, प्रसाद गावडे, नाईक भाऊजी, बाबुराव देऊलकर, अरविंद बांबर्डेकर, अवधूत सामंत, विजय सावंत, लवू गावडे, भास्कर गावडे, पप्या सामंत, अवधूत सामंत, भाई मुळये, संजय गावडे, विलास पवार, सारिका कदम, सोस्मिता बांबर्डेकर, संध्या पवार आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

ट्रान्सफॉर्मर मंजूर करून पावसाळ्यातील विजेची समस्या सोडवल्याबद्दल ग्रामस्थांनी आ. निलेश राणे यांचे आभार मानले.

error: Content is protected !!