कुडाळ : कुडाळच्या देवी केळबाईचाजत्रोत्सव गुरुवार दिनांक १४ नोव्हेंबर रोजी होत आहे. या दिवशी सकाळी १० वा. ओटी भरणे, रात्री ११ वा. पालखी सोहळा, विद्युत रोषणाई, फटाक्यांची आतषबाजीमध्ये हा अभूतपूर्व सोहळा संपन्न होणार आहे.
रात्रौ. १ वा. आजगावकर दशावतार मंडळाचे दणदणीत नाट्यप्रयोग सादर होणार आहे. तेव्हा सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन करण्यात आले आहे श्री. देवी केळबाई मित्रमंडळ कुडाळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.