कामाच्या जोरावर आ.नितेश राणे विजयची हॅट्रिक करतील
एका खुर्चीसाठी उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाची साथ सोडली
लाडकी बहीण योजने बाबत शरद पवारांची दुटप्पी भूमिका
महायुतीचे सरकार बहुमताने जिंकेल
कोकणमध्ये महायुतीच आवश्यक व उपयोगी आहे हे लोकांच्या मनात आता स्पष्ट बसलेले आहे. त्यामुळे या सर्व जागा जिंकत राज्यात महायुतीचे सरकार बहुमातासाठी आवश्यक असलेल्यापेक्षा जास्त जागा जिंकेल असंही यावेळी,भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे म्हणाले. यावेळी भाजप महायुतीचे उमेदवार नितेश राणे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार प्रमोद जठार उपस्थित होते. पुढे विनाद तावडे म्हणाले, कोकणमधील वातावरण पाहता महायुतीला येथे स्पष्ट बहुमत मिळेल यात कोणतीही शंका बाळगण्याची गरज नाही. जिल्ह्यात महायुतीच्या काळात झालेली कामे येथील जनतेला ज्ञात आहेत. कार्यकर्त्यांनी गावागावात पोचून या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान कसे होईल यावर अक्ष द्यावा असे आवाहन आपण कार्यकर्त्यांना केले. केंद्र शासनाने तसेच २०१४ व गेल्या अडीच वर्षात राज्य शासनाने कोकणसाठी जी कामे केली त्यामुळे येथील लोकांच्या मनात महायुती स्पष्ट बसलेली आहे.
कणकवली प्रतिनिधी : कणकवली प्रहार भवन येथे आज भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर महायुतीची पत्रकार परिषद घेतली यावेळी,मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरीसह सिधुदुर्ग मधील मिळून कोकणातील ७५ पैकी ६० जागांवर महायुती निश्चितपणाने जिंकेल. सिंधुदुर्गमध्ये महायुतीच्या काळात झालेली विकास कामे आमदार नितेश राणे. मंत्री दीपक केसरकर यांनी आणलेला निधी व लोकसभेला मिळालेला प्रतिसाद याचा विचार करता जिल्ह्यातील तीनही जागा महायुती जिंकणार हे चित्र स्पष्ट झालेले आहे.असा विश्वास व्यक्त केला आहे.
लाडकी बहीण योजने बाबत शरद पवारांची दुटप्पी भूमिका
लाडकी बहीण सारख्या योजनेलाही अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. आज शरद पवार म्हणतात महायुती एवढा पैसा लाडकी बहिण या योजनेवर खर्च करू शकणार नाही. योजना बंद पडेल. परंतु त्यांच्याच जाहीरनाम्यात ते या योजनेतून तीन हजार रुपये देणार असे जाहीर करत आहेत. त्यांचे ही दुटप्पी भूमिका असून जनता ती जानते असेही तावडे म्हणाले. या मतदारसंघातील व जिल्ह्यातील चाकरमानी मोठ्या संख्येने आहेत. काही कामानिमित्त ते आमदारांना भेटत असतात. मी त्यांना आवाहन करेन की यावेळी आपणाला अधिक जोमाने विकास हवा असल्याने आपण सर्वांनी मतदानासाठी येऊन मतदान करावे.
एका खुर्चीसाठी उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाची साथ सोडली.
२०१९ लाही युतीला बहुमत होतं त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जनादेशाशी गद्दारी केली नसती तर आजच राजकीय चित्र दिसलं नसतं. बाळासाहेब असते तर असे कधी झालेच नसते. एका खुर्चीसाठी हिंदुत्वाची साथ उद्धव ठाकरेंनी कशी काय सोडली याचेच आश्चर्य वाटते.यावेळी ते पुढे म्हणाले,लोकसभा निवडणुकीत वोट जिहादच्या नावाखाली काही एनजीओ अर्बन नक्षल यांनी कॅम्पेनींग केलं खोटा प्रचार केला. त्यासाठी विदेशातून पैसाही आला. लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र २०१४ व २०१९ लाही स्पष्ट बहुम असताना आम्ही घटना बदलली नाही तर ती आता कशी बदलेल हे लोकांना सांगितलं व ते लोकांना पटलेल आहे.त्यामुळे विरोधक भाजप बद्दल खोटे किती ही सांगा ते प्रयत्न सफल होणार नाहीत.
उद्धव ठाकरेंचं मतांसाठी राजकारण करतात
कोणताही प्रकल्प असला तर तो लोकांचे नुकसान न होता होतो, त्यातून रोजगार निर्माण व्हावा अशीच आमची भूमिका आहे. मात्र उद्धव ठाकरे हे सरकारआलं की वेगळी भूमिका आणि सरकार गेलं की मतांसाठी राजकारण करत वेगळी भूमिका घेतात असेही तावडे म्हणाले. निवडणुकीच्या काळात आयोगाच्या सूचनेनुसार अधिकारी बॅगा तपासतात त्याबाबत उद्धव ठाकरेंनी एवढी चिडचिड करण्याचे काय कारण? बॅगेतून काही नेलं होतं का असा मिश्किल सवालही मंत्री तावडे यांनी केला. विधानसभा निवडणूक संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व भाजपाचे केंद्रीय नेतृत्व एकत्रित बसून कोण मुख्यमंत्री आणि कोण मंत्री याबाबतची चर्चा करून निर्णय घेतील, असेही तावडे एका प्रश्नाचे उत्तरात म्हणाले.
जनतेला कधीही उपलब्ध होणारा आमदार म्हणजे नितेश राणे
जनतेला कधीही उपलब्ध होणारा आमदार म्हणून येथील आमदार नितेश राणे यांच्या कामावर कार्यकर्ते खुश आहेत. जाणता समाधानी आहे. कधीही उपलब्ध होणारा आमदार सांगितलेले काम पूर्ण करणारा आमदार म्हणून त्यांची ओळख आहे. गावागावात प्रचारादरम्यान त्याचा फिडबॅक कार्यकर्त्यांना मिळत आहे. विकासाची कामे मोठ्या प्रमाण झालेली आहेत या कामांच्या जोरावरच आमदार नितेशविजयाची हॅट्रिक करतील असेही भाजपाचे राष्ट्रीय सरचिटस विनोद तावडे म्हणाले.













