कुडाळ : किनळोसच्या श्री. देवी माऊली मंदिराला यावर्षी २५ वर्षे पूर्ण होत आहेत. शनिवार दिनांक १९ एप्रिल २०२५ रोजी रौप्य महोत्सवी वर्धापन दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत.
सकाळी ९.३० – श्रींची पूजा
सकाळी १०.०० – श्रींना अभिषेक
सकाळी ११.०० – श्री सत्यनारायण महापूजा
दुपारी १२.३० – आरती व तीर्थप्रसाद
दुपारी १.०० – महाप्रसाद
सायं. ४.०० – ग्रामस्थांची भजने व हरिपाठ
सायं. ६.३० – दिपोत्सव
तर रात्री ९.०० वाजता बुवा – श्री. संतोष दत्ताराम जोईल (श्री. भूतेश्वर प्रासादिक भजन मंडळ खुडी, देवगड) आणि बुवा – श्री. सचिन नरहरी सावंत (श्री. देव लिंग रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ, कडावल – डोंबिवली) यांचा २० × २० डबलबारीचा जंगी सामना आयोजित आयोजित करण्यात आला आहे. तेव्हा सर्व भक्तगणांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.













