.सिद्धिविनायक बिडवलकर याचा खून केलाचा आरोपींकडून कबुली
दरम्यान सदर प्रकरणात अजून काही आरोपी निघण्याची शक्यता असून पोलीस त्यादृष्टीने करीत आहेत तपास..
सिंधुदुर्ग: सिद्धिविनायक बिडवलकरचा खून करून मृतदेह सातार्डा येथील स्मशानभूमीत जाळून मृतदेहाचे अवशेष व राख सातार्डा- तेरेखोल नदीत टाकल्याची आरोपींकडून कबुली दिली आहे. दरम्यान कोकणचा तडाखा न्यूजने सिद्धिविनायक बिडवलकर प्रकरण वेळोवेळी लावून धरल्यानंतर पोलीस प्रशासनासह सिंधुदुर्गात खळबळ उडाली होती.अखेर सिद्धिविनायकचा खुनचं झाला हे आरोपींनी कबूल केल्याने निवती व कुडाळ पोलीसांच्या तपासातून उघड आले आहे.दरम्यान पोलिसांनी आरोपींवर भा. द. वी कलम ३०२,२०१,१२०(ब) ही वाढीव कलमे लावली असून आरोपींना रविवारी कुडाळ न्यायालयात हजर करण्यात येणार असून त्यांची पोलिस कोठडी वाढण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी सिद्धिविनायक अंकुश बिडवलकर प्रकरणातील आरोपींनी सिद्धिविनायक याचा खून करून मृतदेह सातार्डा येथे येऊन जाळल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.
चेंदवण – कुडाळ येथून दोन वर्षांपूर्वी अपहरण करण्यात आलेल्या सिद्धिविनायक उर्फ प्रकाश अंकुश बिडवलकर वय 35 याला शिंदे – शिवसेना गटाचा नेता सिद्धेश शिरसाटसह अमोल शिरसाट, सर्वेश केरकर, गणेश नार्वेकर यांनी कुडाळमध्ये सिद्धेश शिरसाट याच्या घरी नेऊन लाथा बुक्क्यांनी मारहाण केली त्यानंतर त्यास अमोल शिरसाट याच्या पंचायत समिती लगतच्या घरात पुन्हा मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मुख्य आरोपी सिद्धेश शिरसाट व अन्य आरोपींनी सिद्धिविनायक याचा मृतदेह रात्री एका चार चाकी कार मधून सर्वेश केरकर राहत असणाऱ्या सातार्डा येथे नेऊन तेथील काही लोकांच्या मदतीने पहाटेचे सुमारास सदर मृतदेह स्मशानभूमी मध्ये जाळण्यात आला व मृतदेहाचे अवशेष व राख सातार्डा – तेरेखोल नदीत टाकण्यात आले अशी कबुली आरोपींनी दिली आहे.
सदर प्रकरणात अजून काही आरोपी निघण्याची शक्यता असून पोलीस त्यादृष्टीने प्रयत्न करत आहेत.त्यातच मुख्य आरोपी हा सराईत व मुरलेला गुन्हेगार आहे. एकंदरीत ॲड. किशोर वरक यांनी व्यक्त केलेला संशय खरा ठरला असून अखेर सिद्धिविनायक बेपत्ता प्रकरण हे खूनच होते. हे आता पोलीस तपासातून समोर आले आहे.














 
	

 Subscribe
Subscribe









